भाग 11-वजन उंची मापन तयार करणे

🌺🌸🌺🌸 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 11🌸🌺🌺
प्रत्येक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थी ची वजन उंची मोजणे अनिवार्य आहे त्याचसाठी हे उपकरण बनवायचे आहे
🍀 साहित्य - - लाकडी चौकोनी पेटी स्कुटी किवां स्कुटरचा ट्युब  गेलेली बारीक ट्युब लाईट नळी तिचे दोन्ही टोके मोकळे करा   पेट्रोल नळी🍀
🌺 कृती - - 1 ) एक स्कुटीची ट्युब बसेल अशी लाकडी पेटी चौकोनी झाकणासहीत बनवून घ्या झाकणाला ट्युब चा व्हाॅल्व वर निघेल यापद्धतीने एक गोलाकार छिद्र पाडून घ्या
2) ट्युब पेटीमध्ये ठेवा ट्युब चा व्हाॅल्व लाकडी झाकणाच्या छिद्रावाटे वर काढा व त्याला साधारण अर्धा मिटर पेट्रोल नळी एरलडाईट किंवा एम सील द्वारे  फिट बसवा
3) आता पेट्रोल नळीचे दुसरे टोक ट्युब लाइट चे एका टोकाला एमसील द्वारे फिट करा  व दुसरे टोक  पाणी टाकण्यासाठी मोकळे ठेवा
4) आता एक 10×100 सेमी
असी लाकडी फळी किवां पृष्ठ घ्या त्यावर पाढंरे कागद चिकटवून घ्या व ही ट्यूबलाईट ताराच्या सहाय्याने फिट्ट बाधूंन घ्या व ही पट्टी एका भिंतीवर अडकवून ठेवा
    आता माॅडेल तयार झाले आहे
5) एका बकेट मध्ये पानी घेऊन त्यात थोडी निळ मिसळून ठेवा व ग्लास च्या सहाय्याने उघड्या टोकातून
पाणी टाका पाणी जोपर्यंत लाकडी फळीवर एक दोन सेमी पर्यंत वर चढत नाही तोपर्यंत पाणी टाका
6) आता लाकडी फळीवर जिथपर्यंत पाणी चढले आहे तेथे 0 मार्क करा नतंर 1 किलो वजन खाली चौकोनी पेटीवर ठेवा पाणी थोडे वर चढेल तेथे एक किलो अशी खुण करा  0 ते 1 जेवढे अतंर पाणी चढले आहे तेवढे अंतराच्या खुणा पट्टीवर करून घ्या
   लक्षात येण्यासाठी 5 किलो  10  किलो  15  किलो
असा खुणा जाड स्केचपेनने  करा   व त्याच  पट्टी वर  जमिनीपासून  उंची मोजणे साठी  सेमी च्या खुणा करून घ्या
7) आता प्रत्येक विद्यार्थीना पेटीवर चढायला सागां त्याचे वजन मोजा  नतंर त्याला जमीनीवर उभा करू न तेथेच त्याची उंची मोजा
8) वजन व उंची  एकदम  मिळते
9) अस्या प्रकारचे वजनकाटे वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात परंतु हा सर्वात किफायतशीर पाणी टाकणे व काढणे   यासाठी सोपा आहे
🌺 या उपकरणात पास्कलचा नियम वापरल्या गेला आहे
        सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक