भाग 5 -गढूळ पाणी शुद्ध बनविणे

🚝🚲🚟 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 5 🎥🚜🚠
 🌺🌺 गढूळ पाणी शुद्ध बनविणे🌺🌺
🍀 साहित्य- लोखंडी किंवा प्लॅस्टिक घमेले छोटा प्याला प्लॅस्टिक पन्नी छोटे दगडगढ चिकटपट्टी (टिक्सोटेप)🍀
 🌺 कृती - 1) लोखंडी किंवा प्लॅस्टिक चे घमेले घ्या
2) घमेल्यात गढूळ पाणी ओता
3) एक पेला घ्या  पेलात तिन चार छोटे दगड टाका जेणेकरून पेला घमेल्यात न तरंगता स्थिर उभा राहिल
4) पेल्याची उंची पाण्याच्या उंचीपेक्षा जास्त पण घमेल्यापेक्षा छोटी घ्या
5) घमेल्यावर प्लॅस्टिक ची पन्नी पसरवून चिकटपट्टी ने पक्की चिपकवून घ्या
6) आता कागदावर एक दगड मध्यभागी बरोबर प्याल्याच्या वर येईल अस्यारितीने ठेवा परंतु कागद प्यालाला चिकटायला नको
7) आता कागदाला चारहीबाजूने उतार आला असेल व तो उतार प्यालाच्या वर एकवटलेला असेल
8) घमेले कडक उन्हात ठेवा 2 ते 3 तासात प्यालात सांद्रीभवन पद्धतीने  शुद्ध पाणी जमा होईल
🌺🌸 फायदे-- विद्यार्थी ना शुद्ध पाण्याचे महत्त्व सागंता येईल
सांद्रीभवन कसे होते हे सागंता येईल
जल है तो जिवन है या वाक्याचे महत्त्व समजावून देता येईल
संकटसमयी जगंलात किवां कोठेही या पद्धतीने पाणी मिळवता येईल
   सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक