भाग 2 -पाण्याचे रंगीत थर

🎡🎡🎡🎡🚟 विज्ञान खेळणी / प्रयोग 2 🎡🎡
🌺 पाण्याचे रंगीत थर🌺
साहित्य--एक काचेचा उंच प्याला, चार वाट्या , चमचा, मीठ , थंड व गरम पाणी,  पाण्यात मिसळणारे कोणतेही चार रंग
🍀 कृती--1) दोन वाटीत थंड व दोन वाटीत गरम पाणी घ्या
2) एका गरम व एका थंड.वाटीत थोडे मिठ मिसळून घ्या
3) प्रत्येक वाटीत वेगळे वेगळे रंग मिसळून वेगळे वेगळे रंगीत पाणी तयार करा
4) आता उंच काचेच्या प्यालात प्रथम थंड खारट पाणि साधारण एक इंचापर्यंत घ्या
5) आता साधे थंड पाणी एकदम हळूवारपणे प्याल्याच्या काठावरून घसरवत टाका जेणेकरून खालील पाणी हलणार नाही
6) आता गरम खारट पाणि अतिशय हळुवार पणे प्यालाच्या  काठावरून सोडा
7) आता गरम साधे पाणी सोडा
  🙏🏻 टिप- प्रत्येक पाण्याचा थर कमीतकमी एक इंचभर असावयास पाहिजे
8) पाण्याचा थर एकमेकात मिसळत नाही ते तसेच राहत असल्यामुळे आकर्षक कलर बॅन्ड मिळतात
🌺 विज्ञान तत्व- पाण्यात मिठ घातल्यामुळे व पाणि गरम केल्यामुळे पाण्याच्या घनतेत फरक पडतो त्यामुळे पाणि एकमेकात मिसळत नाही
🌺 हाच प्रयोग आपण वेगवेगळे तेल घेवून सुद्धा करू शकतो  तेल गरम करणे व मिठ मिसळण्याची आवश्यकता नाही कारण वेगवेगळ्या तेलाची घनता वेगवेगळी असते
     सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक