भाग 16 -बहुपर्यायी शेती

🌺🌺 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 16 🌺🌺
🍃🌿 बहुपर्यायी शेती🍃🌿
🌸 साहित्य-- कुलरचे पाणी ठेवतात तो टप   4/5  लाकडी पट्टी   जिवंत कोबंडी  अंडे    धातूची जाळी
🌴 कृती-- प्रथम टप मध्ये माती पसरवून घ्या  अर्धा भागात शेत तयार करण्यासाठी मोहरी किवां इतर धान्य टाका
🔸 लाकडी गोट पट्टी(हार्डवेअर मध्ये मिळते)
चे 1.5 किंवा 2 फुटाचे  चार भाग तयार करा
🔸 एरलडाईट किंवा खिळ्याने 4 पट्ट्या खांब म्हणुन उभे करा
🔸   आता हार्डवेअर मध्ये मिळणार्‍या धातूची जाळी घ्या तिचे खाबांत जेवढे अंतर घेतले तेवढ्याच आकाराने सहा भाग कापून घ्या
🔸 एक भाग चार भागावर आडवा टाका व 4 भाग भिंतीं
म्हणून  उभे करा व तारेने घट्ट बाधूंन घ्या
🔸 राहीलेल्या एका भागाचे छत तयार करा🔸 हे कोबंडी चे खुराडे तयार झाले त्याला भिंतीचा एक भाग उघडून दार तयार करा
🔸 आता आपण उचांवर मचांग बाधतो त्याप्रमाणे  कोबंडी चे घर तयार होईल
🔸चार खाबांखाली एक आकाराचा प्लॅस्टिक ट्रे (शेततळे) मध्ये पाणी घेऊन जिवंत मासोळीचे पिल्ले टाका( खेळणी तील मासोळी टाकली तरी चालेल)
🔸आता कोबंडी व अंडे खुराड्यात ठेवून द्या
🔸  पेट्रोल नळी घेऊन हिरव्या शेती प्रर्यंत पाईपलाईन टाका
🔸 तुमचा प्रोजेक्ट तयार झालि
🐃🐄🌺 उद्देश-- आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेती व्यवसाय वर घर चालविणे  कठीण झाले आहे हा प्रोजेक्ट राबविला तर त्याला पुरक व्यवसाय मिळून त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होवू शकते
🌺  कोबंडी ची विष्ठा पाण्यात पडेल व पाणी सेंद्रिय खत युक्त होईल हेच पाणी शेतीला जाउन पिक चागंले येईल व सोबत कोबंडी अंडे व मासोळी याचेही उत्पादन मिळेल
🌺 आजकाल गार्डन रेस्टॉरन्ट ची पद्धत.आहो
शेतकरी ने जर काही गाई शेतात ठेवल्या व काही छोट्या झोपडय़ा शेतात तयार केले तर व फुलझाडे व पालेभाज्या. काही फळांचे झाडे लावली तर सर्वच शेत गार्डन रेस्टॉरन्ट होवून जाईल
🔸 लोक आवर्जून पिकनिक ला येवून भाजी भाकरी अंडे नाॅनव्हेज  फळे फुले याचा आस्वाद घेतील
🔸व शेतकरी आत्महत्या मुक्त होईल
प्रतीकृती मध्ये आपल्या ला याचे संक्षिप्त रूप कल्पकतेने दाखविता.येइल व सोबत आकर्षक चार्ट व काही स्लोगन बनवा🐄🐃🌴🌿
  .  सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक